6 January 2017
ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे निधन
बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे 6 जानेवारी 2016 रोजी वयाच्या 66 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
अल्पपरिचय
- जन्म 18 ऑक्टोबर 1950 रोजी हरियानमधील अंबाल शहरात
- पंजाबमधील पटियाला येथून प्राथमिक शिक्षण
- 1976 मध्ये पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टिट्यूटमधून पुढील शिक्षण
- 'मजमा' या खासगी नाट्यमंडळाची स्थापना
- घाशीराम कोतवाल या मराठी नाटकावर आधारित एका चित्रपटातून कारकिर्दीची सुरवात
- भावनी भवई (1980), सद्गती (1981), अर्ध सत्य (1982), मिर्च मसाला (1986) आणि धारावी (1992) या चित्रपटांमधील त्यांचा अभिनय गाजला.
- जंगल बुक या चित्रपटातील बघिरा या पत्राला त्यांनी आवाज दिला होता.
- त्यांनी शेवटचा अभिनय पाकिस्तानी कॉमेडी चित्रपटात केला.
- हॉलिवूडमध्येही अनेक चित्रपटात काम केले.
- केंद्र सरकारने 1990 मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने त्यांना सन्मानित केले.
FSDC ची 16 वी बैठक दिल्ली येथे पार पडली
- वित्तीय स्थिरता आणि विकास परिषदेची (FSDC) 16 वी बैठक नुकतीच दिल्ली येथे पार पडली. केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांनी या परिषदेचे अध्यक्षस्थान भूषविले होते.
- आरबीआय गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीने तयार केलेला FSDC च्या कार्याचा संक्षिप्त आढावा यावेळी या बैठकीत सादर करण्यात आला.
- या बैठकीमध्ये भारतीय अर्थव्यवस्था, बँकिंग, वित्तीय समावेशन, वित्तीय साक्षरता, तंत्रज्ञान आणि विमुद्रिकरण अशा विविध मुद्यांवर विस्तृतपणे चर्चा करण्यात आली.
काय आहे FSDC ?
- केंद्र सरकारने डिसेंबर 2010 मध्ये वीतीय स्थिरता आणि विकास परिषदेची स्थापना केली. या परिषदेचे अध्यक्ष केंद्रीय वित्त मंत्री असतात.
- रघुराम राजन यांच्या अध्यक्षतेखालील वित्तीय क्षेत्र सुधारणा समितीने (2008) केलेल्या शिफारशिनुसार या परिषदेची स्थापना करण्यात आली आहे.
- ही परिषद निरोगी अर्थव्यवस्था आणि कार्यक्षम आर्थिक व्यवस्थेसाठी आर्थिक क्षेत्रातील उच्च नियामक मंडळ आहे.
- रचना
- अध्यक्ष : केंद्रीय वित्तमंत्री
- सदस्य : वित्तीय क्षेत्रातील नियामक संस्थांचे प्रमुख (उदा. सेबी, आरबीआय, आयआरडीए इ.), वित्त सचिव, वीट सेवा विभागाचे सचिव, प्रमुख आर्थिक सल्लागार.
इंजेटी श्रीनिवास समितीची स्थापना
- केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने सर्वसमावेशक राष्ट्रीय क्रीडा विकास संहिता तयार करण्यासाठी क्रीडा सचिव इंजेटी श्रीनिवास यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे.
- समिती विद्यमान क्रीडा प्रशासन चौकट, क्रीडा प्रशासनासंबंधित समस्या आणि क्रीडा प्रशासनामधील अलीकडील विकास या मुद्यांचा अभ्यास करणार आहे.
- न्यायालयाचे निर्णय आणि अंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धती यांचाही अभ्यास ही समिति करणार आहे.
- समितीमध्ये अभिनव बिन्द्रा, अनुज बॉबी जॉर्ज, प्रकाश पदूकोण, नारिंदर बात्रा, नंदन कामथ, बिश्वेश्वर नंदी, विजय लोकपल्ली यांचा समावेश आहे.
2017 : विकाससाठी शाश्वत पर्यटन वर्ष
संयुक्त राष्ट्र आम सभेने 2017 हे वर्ष अंतरराष्ट्रीय विकाससाठी शाश्वत पर्यटन वर्ष घोषित केले आहे.