निकडीचा पत्रप्रपंच...

आयोगाच्या साहेबाहो ,पुन्हा निवेदन,मोर्चे ,आंदोलन ..त्याशिवाय निर्णय होतंच नाहीत का ??? मायबाप यासाठी म्हणालो की,मायबापाना लेकराची नेमकी गरज ठाऊक असते हो..

Friday, December 9, 2016 Jaypal Khedkar 6 comments

मायबाप सरकार - आयोगाच्या साहेबाहो ,पुन्हा निवेदन,मोर्चे ,आंदोलन ..त्याशिवाय निर्णय होतंच नाहीत का ??? मायबाप यासाठी म्हणालो की,मायबापाना लेकराची नेमकी गरज ठाऊक असते हो..पण काय झालय् आज याच युवाशक्ति ठरलेल्या लेकरांना ओरडून ओरडून काही मागाव का लागतय???  पाळनाघरातल्या मुलाप्रमाने प्रश्न पडतो-सरकार नावाच्या पालकाचे दुर्लक्ष्य होतय,की हटमुन् केल जातय????

परवा पोलीस उपनिरीक्षक पदाची ७५० जागांसाठी जाहिरात आल्याचे संदेश पुण्यापासून आख्या महाराष्ट्रात फिरले. अत्यानंद वाटला.फौजदार हे पद ,ग्रामीण भागापासून ते शहरापर्यन्त स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या परीक्षार्थींचे लोकप्रिय आणि स्वप्नवत पद.खाकीचे युवा वर्गाचे आपलेपण हे समाजाप्रती काही करण्याची मग ते सामाजिक ,गुन्हेगारी काहीही असो यासाठी आहे. त्यासाठी आमचे बरेच स्पर्धक मित्र गेली अनेक वर्षे कसून तयारी करताहेत. मात्र ,अखेरची जाहिरात झाली तशी ,२०१२ नंतर कायम निराशाच त्यांच्या वाट्याला आली. वय वाढत होत ..पण स्वप्न पाहत दिवस ढकलत होते सारे. अखेर एक स्वप्न हा दुआ घेऊन समदुखीची फौज सरकार दरबारी विनवण्या केल्या,अर्जावर अर्ज-निवेदने देऊन वास्थुस्थिती अन तथ्य दर्शविले...मग कुठे मागे साधारण एक-दीड वर्षांपूर्वी ३ वर्षे वय वाढीचा सरकारी आदेश पाहून जीवात जीव आला ..तरीही जाहिरातीचे नाव नाही.पुन्हा जाऊन आंदोलन झाले ,आता जाहिरात आली तर वय वाढ हे केवळ गाजर होते हे कळलं. कारण, नवीन जाहिरातीत वय वाढ केलीच नाही. मग आता नेमका काय करायचं.???  ४-५ वर्षे फुकट घालवली म्हणायचं कि पाठपुरावा ?याला काय म्हणावं..नेमका मूर्ख कोण ...?  सगळं माहित असून मूर्ख बनवणारे कि निमूट सहन करणारे ?

अहो,युवकांना संधीचं सोनं करा ..युवाशक्ती अशी अन तशी पल्लेदार भाषण देणारे आपण ,मुळात मनगटाच्या बळावर सोनं करायला संधी तरी द्या.त्यातही हा छळच नाही का ?  युवाशक्ती एकावटेल क्षणात आंदोलन होईल,निषेधाच्या आरोळ्या उठतील,शरमेने काळे झेंडे फडकतील,निर्णय होतील.पण ,विचार करा -यात खर्ची होणारी शक्ती निर्मितीस लावली तर चित्र वेगळा असेल नक्कीच.आणि आपल्याप्रती आदरही.

मात्र ,सगळं सोडून सतत पाठपुरावा करण शक्य असला तरी असह्य आहे.विकृत वृत्तीशी - गुन्हेगारीशी -समाजकंटकाशी लढण्याआधी आपल्याशी झगडावं लागतंय हे मनाला विचार करायला लावत. नाहीतर ,पाठपुरावा करून करूनच "शिंगरू मेल हेलपाट्यानं.." होऊ नये.हेलपाटयात मारू नका,मैदान दया,तेजतर्रार होऊन पळायला..रेस करायला..पोलिस उपनिरीक्षक पदाच्या या जाहिरातीतच वय वाढीचा निर्णय व्हावा हि अपेक्षा...

- जयपाल मारुतीराव खेडकर.

९५९५६०९८४०



Jaypal Khedkar 9595609840
jmkhedkar@gmail.com

Gallery

Share:

Rachel Britain
Marketing Specialist

Mauris elementum et libero ac pharetra. Proin tristique dapibus tellus, lacinia blandit mi tincidunt at. Vivamus vitae interdum felis. Pellentesque congue mollis erat in imperdiet.

Previous Post Next Post

;