तानाजी मारुती चव्हाण


Contact Member

Tanaji Maruti Chavan

मुख्याधिकारी नगरपालिका

MPSC हा जुगार आहे असं अभ्यास करताना बरेच जण म्हणतात. त्याप्रमाणे मीही म्हणायचो पण हा जुगार जो सातत्याने खेळेल तो एकदा तरी जिंकल्याशिवाय राहणार नाही. परीक्षा पास झालो नाही तरी जीवनात अयशस्वी होणार नाही. जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन या प्रक्रियेमुळे विकसित होतो.... interview


Biography

परीक्षा पास झालो नाही तरी जीवनात अयशस्वी होणार नाही. जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन या प्रक्रियेमुळे विकसित होतो.... ग्रामीण-शहरी, इंग्लिश- मराठी, असा कोणताही भेद न मानता यशाला गवसणी घालणारे तानाजी चव्हाण.

वैयक्तिक माहिती 

नाव : तानाजी मारुती चव्हाण वय : 25 वर्षे, आईचे नाव पंचुबाई

पत्ता : मु. पो. वाडी (बामणी) ता. जि. उस्मानाबाद

शिक्षण :

दहावी : 2007  तुळजाई विद्यालय, वाडी (बामणी)
बारावी : 2009 श्रीपतराव भोसले कनिष्ठ महाविद्यालय, उस्मानाबाद 

डी. एड : 2012 - अ.ए.सो.चे अध्यापक विद्यालय, अहमदनगर
बी. ए. : 2012 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठ
निवड : STI 2012, मुख्याधिकारी 2015

 

नमस्कार मित्रांनो,

माझी राज्यसेवा परीक्षा 2015 मध्ये नगरपरिषद मुख्याधिकारी म्हणून निवड झाली आहे. त्यापूर्वी 2012 मध्ये माझी STI पदी निवड झाली होती. 2012 पासून आजपर्यंतचा प्रवास पाहता संत तुकारामांच्या वरील अभंगाचा अर्थ प्रत्यक्ष अनुभवता आला. कारण 2012 पासून प्रत्येक वर्षी राज्यसेवा मुख्य परीक्षा द्यायचो परंतु सातत्याने नापास व्हायचो. तरीही अभ्यासात खंड न पडू देता मी सातत्याने अभ्यास करत राहिलो या सातत्याचा परिपाक म्हणून यावर्षी निवड झाली. MPSC हा जुगार आहे असं अभ्यास करताना बरेच जण म्हणतात. त्याप्रमाणे मीही म्हणायचो पण हा जुगार जो सातत्याने खेळेल तो एकदा तरी जिंकल्याशिवाय राहणार नाही. माझ्या या यशामध्ये माझ्या सर्व मित्रांचे विशेष आभार मानतो कारण माझ्या घरच्यांपेक्षाही माझ्या मित्रांनी मला मोठी साथ दिली. कारण STI झाल्यानंतर मी बंद केलेला अभ्यास चालू करायला लावून मला नेहमी मात्रे मित्र प्रोत्साहन देत राहिले. त्यांच्यामुळेच आज मला या ठिकाणी लिहिण्याची संधी मिळाली. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो.

1) MPSC च्या परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत करिअर करण्याचे आपण का ठरविले?

या क्षेत्रात व्यापक संधी आणि कामांची विविधता आहे.

2) आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेतून गेलेले आहात, तर या प्रक्रियेबद्दल आपले काय मत आहे?

ही प्रक्रिया व्यक्तीमत्व विकासासाठी उपयुक्त अशी आहे. परीक्षा पास झालो नाही तरी जीवनात अयशस्वी होणार नाही. जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन या प्रक्रियेमुळे विकसित होतो.

3) पूर्व परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती?

C-SAT च्या पेपरवर लक्षे केंद्रीत करणे. वेगवेगळ्या पुस्तकांवर लक्ष असणे आवश्यक आहे. आजूबाजूच्या परिस्थितीचे बारकाव्याने निरीक्षण करणे. तसेच आत्मविश्वासाने आपण पास होऊ या विचाराने अभ्यास करणे.

4) मुख्य परीक्षेच्या अभ्यासासाठी आपण रोज किती तास वेळ दिला? मुख्य परिक्षेचा अभ्यास पूर्व परिक्षेचा निकाल लागल्यावर केला की अगोदरच सुरु केला होता?

जास्तीत जास्त 8 तास सलग खंड पडू न देता अभ्यास केला. पूर्व परिक्षेच्या गुणांची वाट न पाहता मुख्य परिक्षेच्या अभ्यासाला सुरूवात केली.

5) मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना जास्तीत जास्त पुस्तके वाचणे की एकच पुस्तकाचा व्यवस्थित अभ्यास करुन स्वत:चे नोटस् तयार करणे महत्वाचे आहे?

ठराविक पुस्तक वाचणे. प्रत्येक विषयातील चालू घडामोडींचा सतत अभ्यास करणे.

6) मुलाखतीच्या दिवशी मुलाखतीला जाण्याअगोदर व मुलाखत झाल्यानंतर आपल्या मनात काय विचार आले होते?


मुख्य परिक्षेला गुण चांगले असल्यामुळे पास होण्याची शक्यता होती. पण मनावर दडपण होते. मुलाखत साधारण होती. मनात विश्वास होता की कोणती तरी एक पोस्ट मिळेल असा आत्मविश्वास होता.


7) आपणास मुलाखतीत कोणते प्रश्न विचारले गेले होते?

      • Maharashtra Civil Services Rule
      • संजय दत्तला शिक्षा का झाली? व लवकर का बाहेर आला?
      • शनिशिंगणापूर प्रश्नावर तुमची प्रतिक्रिया?
      • तृप्ती देसाई कोण आहेत?
      • विदर्भ मराठवाडा महाराष्ट्रातून वेगळे व्हावेत का?

8) अंतिम निकाल जाहीर झाल्याचे आपण कसे समजले व निकाल कळला तेव्हा आपल्याला काय वाटले?

4 वर्षाच्या मेहनतीचे फळ मिळाले. यश प्राप्त झाले. खूप आनंद झाला.

9) आपल्या यशाममध्ये कोणाचे मोलाचे योगदान आहे?

आई-वडील, भाऊ, मित्र परिवार यांचे प्रोत्साहन डॉ. आनंद पोटी सर यांचे प्रत्येक मंगळवारी भेटून अभ्यासाचे मार्गदर्शन घेतले. मॅडम व सर मला नेहमीच मार्गदर्शन करत असत.

सातत्यपूर्ण तयारी हीच यशाची गुरुकिल्ली

;