राज्यसेवा GS-3

Saturday, November 19, 2016

Type:Main

राज्यसेवा GS-3, तयारी कशी कराल.राज्यसेवा GS - III (Strategy)

मानवी संसाधन विकास आणि मानवी हक्क

राज्यसेवा मुख्य परिक्षेतील अतिशय कठीण पेपर असा गैरसमज असलेला व विनाकारण बाऊ केलेला हा विषय आहे.

मुळत: रचनात्मक अभ्यास तसेच Internet आणि शासकीय संकेतस्थळे यांचा योग्य वापर केल्यास निश्चितच जास्तीत जास्त गुण मिळवून देणारा हा विषय आहे. 

प्रश्नांचेप्रकरणानुसारवर्गीकरण

भाग 1HRD

Sr.No

प्रकरण

2012

2013

2014

2015

1)

भारतातीलमानवसंसाधन

19

17

14

18

2)

शिक्षण

28

22

20

20

3)

व्यावसायिकशिक्षण

09

11

-

02

4)

आरोग्य

14

10

12

18

5)

ग्रामीणविकास

05

15

17

07

 

भाग 2 : मानवीहक्कविकासकार्यक्रम

Sr.No

प्रकरण

2012

2013

2014

2015

1)

UDHR

14

13

15

09

2)

बालविकास

07

06

08

10

3)

महिलाविकास

07

13

07

08

4)

युवकांचाविकास

06

06

05

03

5)

आदिवासीविकास

03

04

04

05

6)

वंचितवर्गाचाविकास

03

04

02

07

7)

ज्येष्ठनागरिकांचेकल्याण

05

04

05

08

8)

कामगारकल्याण

05

06

04

06

9)

विकलांग (दिव्यांग) कल्याण

04

03

07

06

10)

लोकांचेपुर्नवसन

04

02

03

01

11)

आंतरराष्ट्रीयप्रादेशिकसंघटना

11

06

14

14

12)

ग्राहकसंरक्षण     

05

04

05

05

13)

मुल्यनितीतत्वे

01

04

02

03

 

Sr.No

Pattern

2012

2013

2014

2015

2016

1)

One Liner

105

88

48

48

70

2)

Two Liner

04

12

42

45

12

3)

Three Liner

40

41

50

44

58

4)

Match the Pairs

01

09

10

13

10

प्रकरण 1 : मानव संसाधन विकास

या विषयावर विभाग 1 मध्ये 15 ते 20 प्रश्न विचारले जात असून हे प्रकरण सामान्य अध्ययन 3 चा पाया आहे. या प्रकरणासाठी ‘Ministry Of HRD’ या विभागाची Website -  mhrd.gov.in याचा सविस्तर अभ्यास करणे अतिशय फायदेशीर ठरते.

मनुष्यबळ विकासाकरीता कार्यरत असलेल्या शासकीय संस्था उदा. NCERT, UCG, AICTE इत्यादी संस्थांची स्वतंत्र संकेतस्थळे आहेत. त्यामुळे Notes काढताना या संकेतस्थळाबरोबरच Wikipedia चा पण पूरक वापर करावा.

प्रकरण 2 : शिक्षण

या प्रकरणासाठी 11 वी शिक्षणशास्त्र हे महाराष्ट्र राज्याचे पुस्तक त्याबरोबरच शासकीय योजना यासारखी पुस्तके Milestone ठरतात.

प्रौढ शिक्षण, औपचारिक शिक्षण यासाठी India Year Book (इंडिया इयर बुक) या पुस्तकाचा वापर करावा. पहिल्या प्रकरणानंतर अतिशय महत्वाचे हे प्रकरण असून यावर दरवर्षी 20 ते 25 प्रश्न विचारले जातात. त्यासाठी मुख्य परिक्षा अभ्यासक्रमातील सर्व मुद्यांचा इत्यंभूत अभ्यास करावा.

प्रकरण 3 : व्यावसायिक शिक्षण

या प्रकरणावर सर्वात कमी प्रश्न विचारले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे प्रकरण सर्वात शेवटी करावे. या प्रकरणासाठी युनिक भाग 1 मानव संसाधन विकास या पुस्तकांचा वापर करावा.

प्रकरण 4 : आरोग्य

महत्वाच्या प्रकरणापैकी हे एक प्रकरण असून त्यासाठी सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी Indian Year Book 2016 हे पुस्तक सविस्तर वाचावे. त्याबरोबरच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची Website – mohfw.nic.in या संकेतस्थळाचा पूरक वापर करावा.

त्याबरोबरच WHO (World Health Organisation) या संस्थेची Website तसेच NFHS (National Family Health Survey) तसेच शासकीय योजना या पुस्तकांचा आधार घ्यावा.

प्रकरण 5 : ग्रामीण विकास

ह्या प्रकरणासाठी ग्रामीण मंत्रालयाची Website – rural.nic.in पुरेशी ठरते. पण त्याबरोबरच HRD कोळंबे व अर्थशास्त्र भाग 2 : डॉ. देसले या पुस्तकांचा आधार घ्यावा.

सविस्तर विश्लेषण : मानवी हक्क

प्रकरण 2.1 (UDHR 1948)

या प्रकरणाचा अभ्यास करताना Universal Declaration of Human Rights 1948 सर्वप्रथम Word By Word वाचावे. त्यानंतरच YCMOU (मुक्त विद्यापीठाची) HRC 001 & HRC 002 ही पुस्तके सविस्तरपणे वाचावीत. हे प्रकरण कमी वेळात निश्चितच जास्त गुण मिळवून देते.

प्रकरण 2.2 - बाल विकास आणि प्रकरण 2.3 महिला विकास

हे प्रकरण वाचताना केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाची Website पूर्ण चाळावी. अभ्यासक्रमातील सर्व मुद्यांच्या बाबतीत स्वत:च्या हस्तलिखीत नोटस् काढल्या तर उत्तम राहील.

त्याबरोबरच UNCRC (United Nation Convention on Rights of Child) 1989 देसले भाग 2 आणि ‘शासकीय योजना’ सारख्या पुस्तकांचा आधार घ्यावा.

प्रकरण 2.4 युवकांचा विकास

‘राष्ट्रीय युवक धोरण’,  आंतरराष्ट्रीय संस्था (युवकांसाठी) हे मुद्दे ‘इंडिया ईअर बुक’ या पुस्तकात सविस्तर दिले आहेत. या प्रकरणावर साधारणत: 5 प्रश्न विचारले जातात. या सोबतच युनिक (फक्त Limited मुद्दे) वाचायला हरकत नाही.

प्रकरण 2.5 - आदिवासी विकास

प्रथमत: केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयाची वेबसाईट tribal.nic.in ही सविस्तर अभ्यासावी. त्यासोबतच इंडिया ईअर बुक, शासकीय योजना या पुस्तकांचा आधार घ्यावा.

प्रकरण 2.6, 2.7, 2.8, 2.9 आणि 2.10

या वरील पाच प्रकरणांचा (2.6 ते 2.10) केंद्र सरकारची सामाजिक न्याय मंत्रालयाची वेबसाईट उत्तम स्त्रोत आहे. त्यात विकलांग (दिव्यांग) व्यक्तींची स्वतंत्र वेबसाईट उपलब्ध आहे. संकेतस्थळावरील उपलब्ध असलेले मंत्रालयाच्या सर्व विभागाची, त्यांची धोरणे व नवीन अद्ययावत योजनांची माहिती घ्यावी. याबरोबरच देसले भाग 2, इंडिया ईअर बुक, ‘शासकीय योजना’ आणि युनिक (मर्यादित मुद्दे) यांचे वाचन उपयुक्त ठरते. या पाच प्रकरणावर एकूण 25 ते 30 प्रश्न विचारले जातात.

प्रकरण 2.11 आंतरराष्ट्रीय संघटना

या प्रकरणासाठी Wikipedia हे उत्तम स्त्रोत आहे. विकीपिडीयाचे स्वतंत्र App आहे, त्यावर सर्व संस्थांचे Web Pages Save करावेत. जेणेकरुन Offline केव्हाही या संस्थांचा अभ्यास करता येतो. आंतरराष्ट्रीय संघटना अभ्यास करताना UNO व त्यांच्या संलंग्न संस्था, त्यांची उद्दीष्टे, Logo, Motto, परिषदा यांचा सविस्तर नोटस् काढाव्यात. यासोबतच प्रत्येक संघटनांचे स्वतंत्र वेबसाईटस् आहेत. त्यांचा पण नीट अभ्यास करावा. हे प्रकरण अतिशय महत्वाचे असून यावर 10 ते 15 प्रश्न विचारले जातात.

प्रकरण 2.12 ग्राहक संरक्षण

ग्राहकांचे हक्क, विवाद आणि ग्राहक संरक्षण कायद्यासाठी YCMOU (मुक्त विद्यापीठ) HRC 001 & HRC 002 या पुस्तकांचा आधार घ्यावा. सोबतच NCRDC (ग्राहक संरक्षण आयोग) याची Website व्यवस्थित अभ्यासावी.

प्रकरण 2.13 मूल्ये व नीतीतत्वे

हे प्रकरण कोणत्याही पुस्तकात सविस्तरपणे उपलब्ध नसून इंटरनेट हे सर्वोत्तम स्त्रोत आहे. Ethics & Integrity ची Short Notes पाहून घ्याव्यात. या प्रकरणावर 02 ते 03 प्रश्न विचारले जातात. त्यामुळे सामाजिक मूल्ये व व्यवहारज्ञानावर या प्रश्नांची उत्तरे सहज मिळतात.

;