राज्यसेवा सामान्य अध्ययन





Saturday, November 19, 2016

Type:Pre

राज्यसेवा सामान्य अध्ययन, तयारी कशी कराल...?


राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण

राज्यसेवा पूर्व परीक्षा ही राज्यशासनाच्या राजपत्रित गट अ व गट ब संवर्गातील पदांच्या नियुक्तीतील महत्वाचा टप्पा आहे. राज्यसेवा परीक्षेत सर्वात जास्त स्पर्धा आणि अनिश्चितता पूर्व परीक्षेच्या टप्प्यावर असते. आपले Strong Points कोणते हे आपण ठरवले पाहिजेत. त्यात GS किंवा CSAT असू शकते. सध्या CSAT हा Merit Deciding Factor असला तरी GS (सामान्य अध्ययन) या विषयाला दुर्लक्षित करता येणार नाही. पूर्व आणि मुख्या परिक्षा यात जवळपास 60% अभ्यासक्रम सारखा असून Integrated Approach महत्वाचा ठरतो. 

मागील 4 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे नीट अवलोकन केल्यास खालीलप्रकारे वर्गीकरण करण्यात येईल.

Topic

Sub Topic

2013

2014

2015

2016

चालू घडामोडी व सामान्यज्ञान

राज्यविषयक

02

02

01

00

राष्ट्रीय

06

10

13

08

आंतरराष्ट्रीय

06

03

14

-

एकूण

14

15

23

9+13

 

 

 

 

 

 

इतिहास

प्राचीन भारत

04

03

04

04

मध्ययुगीन

01

09

-

03

आधुनिक भारत

08

06

14

11

स्वातंत्र्योत्तर भारत

02

01

02

00

 

एकूण

15

19

20

18

 

 

 

 

 

 

भूगोल

प्राकृतिक

08

07

10

11

सामाजिक

05

06

06

04

आर्थिक

02

03

04

04

पर्यावरण

03

10

04

05

कृषी

04

04

04

00

एकूण

25

30

28

24

 

 

 

 

 

 

राज्यशास्त्र

संविधान

10

07

06

03

राज्यव्यवस्था

01

03

03

08

पंचायत राज

03

00

00

00

एकूण

14

10

09

11

 

 

 

 

 

 

अर्थशास्त्र

भारतीय अर्थव्यवस्था

10

02

06

04

लोकसंख्या विषयक

02

03

06

00

शासकीय योजना

03

01

00

01

एकूण

15

06

12

05

 

 

 

 

 

 

विज्ञान

जीवशास्त्र

07

14

09

08

रसायनशास्त्र

13

09

05

04

भौतिकशास्त्र

03

05

06

08

एकूण

23

28

20

20

 

इतिहास ह्या विषयासाठी सध्यातरी वाचन जास्त आणि Output कमी येत आहे. तरीपण मुख्य परिक्षेच्या दृष्टीने हा विषय अत्यंत महत्वाचा आहे.
पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार इतिहास हा विषय तीन प्रकारात विभागला आहे.

    1. प्राचीन  
    2. मध्ययुगीन  
    3. आधुनिक (1857-1950)

प्राचीन व मध्ययुगीन’ इतिहासासाठी महाराष्ट्र शासनाची क्रमीक पुस्तके व Lucent सामान्य ज्ञान ही पुस्तके परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरतात. आधुनिक भारत या प्रकरणासाठी ग्रोव्हर आणि बेल्हेकर आणि बिपन चंद्रा यांची पुस्तके वाचावीत.


या विषयात महाराष्ट्राच्या इतिहासावर बरेच प्रश्न विचारले जातात. त्यासाठी अनिल कटारे यांचे पुस्तक पुरेसे ठरते.


(II)भूगोल

भूगोल ह्या विषयात संकल्पना व Factual Data यांचा संगम आढळतो. पण योग्य नियोजन व रचनात्मक अभ्यास केल्यास निश्चितच जास्त गुण मिळतात.

भूगोल हा विषय 3 विभागात वर्गीकृत केला जाऊ शकतो.

      • प्राकृतिक
      • मानवी व सामाजिक 
      • आर्थिक

 ह्या तिन्ही विभागांचे जग, भारत आणि महाराष्ट्र असे पुन्हा वर्गीकरण करता येईल.


(1) प्राकृतिक भूगोल (जगाचा)

या प्रकरणासाठी NCERT 11 वी, 12वी आणि महाराष्ट्र राज्याची 11वी, 12वी क्रमीक पुस्तके ही उत्तम स्त्रोत आहेत. 

(2) भारताचा भूगोल

या प्रकरणाची NCERT व राज्य शासनाच्या क्रमीक पुस्तकांबरोबरच ए. बी. सवदी सरांचे पुस्तक सर्वोत्तम संदर्भ ठरतात. अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी नकाशांचा (Atlas) पुरेपूर वापर करावा. काही प्रकरणासाठी स्वतंत्र Flow Charts काढल्यास Revision करताना निश्चितच फायदा होतो. 

(3) महाराष्ट्राचा भूगोल

या प्रकरणासाठी राज्य शासनाची पुस्तके व महाराष्ट्राचा भूगोल खतीब (K’sagar) ही पुस्तके पुरेसी आहेत. अभ्यासक्रमातील विविध मुद्यांसाठी ए. बी. सवदी सरांचे ‘महाराष्ट्राचा प्रगत Atlas’ ह्या पुस्तकांचा आधार घेतल्यास निश्चितच फायदा होतो. 


(III) भारतीय राज्यघटना व पंचायतराज

Polity हा विषय कमी वेळात जास्त गुण मिळवून देणारा आहे. GS मधील इतर विषयांशी तुलना करता संकल्पना नीट समजल्या असल्यास पैकीच्या पैकी गुण मिळतात.

या विषयासाठी सर्वप्रथम M. Laxmikant  किंवा कोळंबे सरांचे पुस्तक उत्तम स्त्रोत आहे. पण काही मुद्यांसाठी ‘”आपली संसद - सुभाष कश्यप” ह्या पुस्तकाचा आधार घ्यावा.

पंचायतराज हे प्रकरण YCMOU (मुक्त विद्यापीठ) च्या पुस्तकांतून पूर्णपणे वाचून त्यावर Charts च्या रुपात तुलनात्मक notes काढाव्यात.


(IV) सामान्य विज्ञान

सामान्य विज्ञान हा विषय काही विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना अवघड जातो असा गैरसमज आहे पण आयोगाच्या मागील वर्षाच्या प्रश्नाचे व्यवस्थित विश्लेषण केल्यास व अवघड संकल्पना Discussion द्वारे नीट समजून घेतल्यास ह्या विषयात निश्चितच चांगले मार्क्स मिळतात.

या विषयासाठी NCERT व राज्य शासनाची क्रमीक पुस्तके ही उत्तम संदर्भ आहेत. त्याबरोबरच Lucent सामान्य विज्ञान हे पुस्तक पुरेसे आहे. मानवी आरोग्यशास्त्रासाठी डॉ. विशाल माने यांचे विज्ञानाचे पुस्तक उपयुक्त आहे.


((VI) पर्यावरण

या प्रकरणावर 5 ते 8 प्रश्न विचारले जातात. पण भूगोल या विषयासोबत एकत्रित अभ्यास केल्यास मुख्य परिक्षेसाठी यांचा उपयोग होतो.

पर्यावरण या विषयासाठी इंग्रजी माध्यमातील Environment – Shankar IAS किंवा मराठी माध्यमातील पर्यावरण- तुषार घोरपडे (युनिक) ही उत्तम संदर्भग्रंथ आहेत. त्याबरोबरच पर्यावरण मंत्रालयाची Website एकदा चाळून घ्यावी. 

(VII) चालू घडामोडी

चालू घडामोडी या विषयांचा अभ्यास दररोज केेल्यासच परिक्षेत उत्तम गुण मिळतील. या विषयासाठी सकाळ, लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाईम्स सारखी वृत्तपत्रे, PIB (Press Information Bureau) चे App किंवा  Website व लोकराज्य सारखी मासिके उत्तम स्त्रोत आहेत.

विद्यार्थ्यांनी नियमित चालू घडामोडीतील प्रत्येक विभाग - राजकीय, सामाजिक, आर्थिक, विज्ञान आणि तंत्रज्ञान, क्रिडा, व्यक्तीविशेष आणि पुरस्कार स्वतंत्र Notes काढाव्यात. याबरोबरच चालू घडामोडी या विषयासाठी - सकाळ current updates आणि पृथ्वी / युनिक इत्यादी. कोणतेही एक मासिक वाचायला हरकत नाही.

परीक्षेला कमी वेळ असताना विविध प्रकाशनाची मासिके उपयुक्त ठरतात पण स्वत:च्या हस्तलिखित Notes कधीपण इतरांपेक्षा सरस ठरतात.


(VIII) बुद्धिमत्ता चाचणी:

या विषयात दररोज सराव केल्यास निश्चितच चांगले गुण मिळतात. विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम वा. ना. दांडेकर सारखी पुस्तके अभ्यासल्यानंतरच R . S Agarwal यांची पुस्तके वापरावीत.






;