नरेश मनोहर पतंगे


Contact Member

Naresh Manohar Patange

कक्ष अधिकारी

शालेय मार्क लिस्ट वर नेहमी ५०-५५% मार्क होते, पण मनात न्यूनगंड न्हवता, कारण Uniformed services च आकर्षण स्वस्थ बसून देत न्हवत. अभ्यास जोरात केला आणि UPSC mains, CDS, Asst. Commandant परीक्षा पास होत गेलो. शालेय मार्क्स चा स्पर्धा परीक्षेचा एवढा संबंध नाही, ...सांगत आहेत नरेश पतंगे interview


Biography

नाव : नरेश मनोहर पतंगे

पद : Section Officer

शिक्षण : B Sc Physics, pursuing M A (Public Administration)

अनुभव :

A) 4 .5 years as NOC Engineer in First Source Technologies Limited. (March2007 - Sept2010)

B) 1.5 years as Senior Telecommunication Engineer at Morgan Stanley Advantage Services. (Sept 2010 - December 2011)

Details of other competitive exams success/ failure:

Preparing for UPSC Civil Services exam since January 2012, appeared 2014, 2015, 2016 mains.

पूर्व परीक्षा मार्क्स : 185

मुख्य परीक्षा मार्क्स: 327

अंतिम मार्क्स : 391

१. तुमच्याविषयी थोडक्यात सांगा. तुम्ही केंव्हा पासून या क्षेत्राकडे वळला? 

मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातुन आलो आहे. बाबा रेल्वे मधे गार्ड या पदावर कार्यरत आहे. आई गृहिणी आहे. अभ्यासात यथा तथा ( माझ्या शिक्षकांच्या भाषेत 'ढ') असल्याने आणि लक्ष शाळेतल्या इतर गोष्टींमध्ये अडकल्याने काठावर पास होत आलो आहे. घरच्यांना वाटले कि कॉलेज मध्ये जाऊन तरी अभ्यासात गोडी निर्माण होईल. त्यांनी मला कॉलेज मध्ये पाठवले. पण इथेही येरे माझ्या मागल्या. 

काही नाही तरी एका गोष्टीत सातात्य होते, ते म्हणजे माझे result मधील टक्के. सातत्याने 50-55 टक्के मार्क मला माझ्या शैक्षणिक जीवनात पडले आहेत. घरातल्या आर्थिक स्थितीमुळे आणि मुंबई जवळ राहत असल्याने मला graduation नंतर लगेच जॉब मिळाला. 

पण uniformed services चं आकर्षण मला स्वस्थ बसू देत नव्हतं. पण मनात भीती मात्र वाटत होती की मी खरंच पास होऊ शकतो का? 

मी 2011 मध्ये UPSC ची सिविल सर्विसेस परीक्षा द्यायची असे ठरवले. भीती वाटत तर होतीच, पण एक आशा होती. ती म्हणजे राज्यसेवा असूदे किंवा केंद्रीय लोकसेवा, 50% मार्क काढणारा पास होतोच. आणि मी सातत्याने 50 टाके मार्क काढत आलो आहे.

२. प्रत्येकाला अभ्यासक्रम माहित असतो, पण त्यामध्ये सातत्य राहत नाही. तर तुम्ही study distraction आणि mood swingers वर कसे control ठेवला ?

अभ्यासात सातत्य राखणं अवघड आहे. खासकरून जेव्हा तुंम्हाला वर्षभर किंवा त्याहून जास्त काळ अभ्यास करायचा असतो. Study distractions आणि mood swingers’ प्रत्येकाला येतात. पण तुम्ही त्यातुन किती लवकर बाहेर पडता, हे महत्वाचा आहे. Self Motivation तुम्हाला योग्य रस्त्यावर ठेवते.

कॉलेज मध्ये NCC केले असल्याने मला अभ्यासात सातत्य ठेवता आले. Mood स्विंग झालाच तर मी माझ्या मित्रांसोबत गप्पा मारायचो, त्यामुळे inspiration मिळायचं.सर्व मित्र अभ्यासू असल्यामुळे या गोष्टींचा जास्त त्रास झाला नाही.
मला वैयक्तीक पणे वाटते की जर तुमचे मित्र चांगले असतील तर study distractions कमी होतात.


३. MPSC च्या बदलत्या प्रश्नांबाबत काही comment?

आययोगाच्या मागील 3 वर्षांचे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बघितले तर लक्षात येईल की काही प्रश्न अवघड स्वरूपाचे असतात आणि अश्या प्रश्नांमुळे आपण परीक्षेत आपलं संतुलन गमावतो.राज्यसेवा मुख्य परीक्षेत 150 प्रश्न असतात, मी असे समजतो कि 35 प्रश्न भरपूर अवघड असतात, या 35 प्रश्नांना आपण घाबरून जायचा कारण नाही. आपण उरलेल्या 115 प्रश्नांवर लक्ष दिले पाहिजे, परीक्षेत top rank होल्डर्स ना सुद्धा 50% मार्क्स असतात.

४. तुम्ही कोणती test series लावली होती का? Exam पास होण्यासाठी ती कितपत गरजेची ठरते? 

मी टेस्ट series लावली नव्हती पण मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका विश्लेषणासाहित सोडवल्या होत्या.

५. या परीक्षां मधील नवखे जुन्या लोंकाना घाबरतात आणि न्यूनगंड तयार होतो. परीक्षेच्या दृष्टीने तुमचा Approach कसा होता? 

परीक्षेचे स्वरूप बघून नवीन तयारी करणाऱ्या मुलाना भीती वाटणे सहजी आहे. भीती घालवण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. जरी लाखो मुले परीक्षेला बसत असले , तरी मी माझा अभ्यास व्यवस्थित करेन,उजळणी करेन आणि सराव परीक्षा सोडवेन, हा विचार प्रत्येक नवीन मुलाने करणे फायद्याचे ठरेल आणि यश नक्कीच हाती येईल.

६. तुम्ही जर select झाला नसता, तर तुमचा काही Backup Plan होता का? 

असा काही Back up प्लॅन नव्हता. कारण ज्या वयात मुले स्पर्धा परीक्षे चे क्षेत्र सोडून दुसऱ्या कामधंद्याकडे वळतात, त्या वयात मी वर्षाला 5.5 lakh चे package सोडून अभ्यासाला लागलो होतो मागे जाण्यात काही अर्थ नव्हता. काहीच नसतो झालो तरी पोट भरन्यासाठी कुठलाही जॉब करण्याची तयारी ठेवली होती.

७. या संघर्ष आणि सफलतेच्या प्रवासात तुम्ही खूप काही शिकला असाल. नवीन मुलं/मुलींसाठी तुमचा काही सल्ला ?

दरवर्षी राज्यसेवेच्या 200-300 जागांसाठी लाखो उमेदवार स्पर्धा करतात, सर्वांना यश मिळणं अवघड आहे. तरीही प्रत्येकाने स्वतःवर विश्वास ठेऊन प्रयत्न करावे. भगवद गीतेतील दुसऱ्या अध्यायतील 47 व्या श्लोकामधे म्हंटल्याप्रमाणे आपण वागले पाहिजे असे मला वाटते. 

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।

मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥

स्पर्धा परीक्षेत यश मिळवणं महत्वाच आहेच, पण सोबतच हि आपल्या सर्वांना संधी आहे, स्वतःला develop करायची. त्याचा आपण पुरेपूर् वापर केला पाहिजे. बाबा रँचो यांनी 3 idiots मध्ये सांगितलेच आहे की 'perfection के पिछे लग, success तो अपने आप हि पीछे आयेगा!

८. तुम्ही जॉब करत अभ्यास केला का? असलेल्या वेळेचे नियोजन कसे करायचे याबद्दल काही सांगू शकाल का? 

माझ्या कामाच्या स्वरूपामुळे मला जॉब वरच लक्ष केंद्रित करणे आवश्यक होते . तरी सुट्टी असेल तेव्हा मी प्रतियोगीता दर्पण, competition success review सारखे magazines वाचायचो.

९. MPSC Pre मध्ये score करणं खूप कठीण झालाय. हा महत्वपूर्ण टप्पा कसा पार करावा, याबद्दल काय सांगाल? 

GS पेपर च्या काठिण्यपातळीमुळे त्यात score करणे अवघड झाले आहे. CSAT मध्ये प्रत्येकाने आपले strong areas ओळखावे आणि त्यावर काम करावे. मला गणित आणि बुद्धिमत्ता चांगले जमायचे. मी त्यातील 25 प्रश्न मी बरोबर सोडवले होते. Passages मधे माझे प्रश्न चुकत असल्यामुळे मी passages सोडवताना जरा सावध असायचो. तात्पर्य: सराव प्रश्नपात्रिका सोडवून आपण आपल्याला काय चांगले येते याचा अंदाज घेतला पाहिजे. जिथे हमखास प्रश्न चुकत असतील तिथे सावधगिरी बाळगली पाहिजे.

१०. खूप जणांचे यावर मतांतर आहे कि, MPSC Mains मध्ये किती प्रश्न attempt करावे? तुमचे मत काय आहे? 

आधीच ठरवून जाणे कि मी आज मुख्य परीक्षेत xyz प्रश्न सोडवून येणारच हि चुकीची strategy असेल. जसे क्रिकेट खेळताना बॅट्समन बॉल बघून ठरवतो कि pull करायचा कि straight drive आपण हि प्रश्नपत्रिका बघून ठरवलं पाहिजे. 0.33 ची negative मार्किंग असल्यामुळे आपण किती प्रश्न attempt करत आहोत यापेक्षा किती बरोबर आहे, हे महत्वाचं आहे. एखाद्याने 148 attempt केले आणि त्यातील 74 चुकले तर त्याचा स्कोर 49.34 येतो. या उलट जर कोणी फक्त 100 confidently attempt केले आणि त्यातील 21 चुकले तरी त्याचा score 72 येतो.Risk घेणं हि आवश्यकता आहे, पण सोबतच ती कला सुद्धा आहे. Practice ने कला वाढेल.

११. पूर्व आणि मुख्य परीक्षा या मधल्या काळातील अभ्यासाविषयी तुम्ही काय सांगाल? 

वेळ कमी असल्यामुळे पूर्व परीक्षा झाल्यावर लवकरात लवकर तयारी सुरु करावी. Cutoff prediction आणि जागा वाढतील कि नाही या वायफळ गोष्टींवर चर्चा करण्यात वेळ घालवू नये.

१२. आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना काही चुका केल्या असं वाटतंय का, कि ज्यामुळे यश थोडा वेळ लांबलं ?

मी सुरुवातीला फक्त वाचन करण्यावर लक्ष दिले, प्रश्नापत्रिका सोडवल्या नाहीत. त्यामुळे यश लांबले, असे मला वाटते.

१3. भाषेचा पेपर नेहमी दुर्लक्षित राहतो त्यावर किती व कसा भर द्यायचा? 

तुमचा GS चा score तुम्हाला interview call मिळवून देऊ शकतो पण पोस्ट मिळेल कि नाही, किंवा कोणती मिळेल हे भाषेच्या गुणांवर ठरेल. भरपुर मुले या दोन विषयावर दुर्लक्ष करतात, पण भाषाच तुम्हाला इतरांच्या तुलनेत edge देईल.

१4. तुम्ही Revision साठी स्वतःच्या नोट्स बनवल्या होत्या का.? त्याची कितपत गरज आहे?

स्वतःच्या नोट्स शॉर्ट मध्ये असणं गरजेचं आहे. 2 दिवसांमध्ये 4 GS पेपर होत असल्याने, आपल्या नोट्स बनवणं नेहमी चांगले.

नोट्स बनवताना लक्षात असू द्या:
अ) नोट्स 2 तासात revise करता आल्या पाहिजेत
ब) उत्तर आपल्या समोर असतात जिथे आपण फसायची शक्यता असते, अश्या topics चे short notes काढावेत.
क) राज्यसेवा परीक्षेत आकडेवारीला महत्व आहे. तेव्हा GS 4 साठी ची आकडेवारी नक्कीच काढावी आणि ती मधल्या gap मध्ये revise करावी.

सर्व विद्यार्थी बांधावाना परीक्षेसाठी शुभेच्छा !!!

;