Abhijeet Kadam
मुलाखतीची तयारी करायची म्हणजे नेमके काय करायचे? हा भल्या भल्या लोकांना सतावणारा प्रश्न आहे. बरेचजण बाजारात असलेली Current Affairs ची पुस्तके घेऊन येतात व त्याचा रट्टा मारायला सुरुवात करतात. काहीजण आपल्या MPSC Profile ची प्रिंट काढून त्याआधारे कोणते factual प्रश्न विचारले जातील त्याच्या तयारीला लागतात. पण अशा तयारीला काही अंत नसतो. अशा प्रकारच्या तयारीने Confidence नाही तर Tension वाढते interview
Biography
नाव: अभिजीत उद्धवराव निकम
शिक्षण:
- MSc BiotechnologyPhd
- Fellow :M.S University Baroda
- Researchfellow: Tata Cancer Hospital.
अनुभव:
- Entrepreneurial venture: Sahyadri Biogreen Biofertilizer production unit
international publications - पद: नायब तहसीलदार
मुलाखत मार्क: ७१/१००
मुलाखतीचे तंत्र :
मुलाखत हा कोणत्याही परीक्षेचा अंतिम टप्पा असल्याने त्याचे महत्व वादातीत आहे. तुमच्या Dream Post पर्यंत नेणारा प्रमुख टप्पा म्हणूनच याकडे सर्वजण पाहत असतात. तरीही तयारी पाहता पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा यांच्या तुलनेत मुलाखातीकडे किंचित दुर्लक्ष केले जाते. काही सरळ सेवा परीक्षांचा अपवाद वगळता मुलाखतीसाठी किमान गुणांचा निकष इतर कोणत्याही परीक्षेस आयोगाने अजूनही लागू केला नाही. मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला कितीही उत्कृष्ट गुण असूद्यात तुम्हाला Post Class १ मिळणार की Class २ किंवा कोणतीच मिळणार नाही हे सर्वस्वी तुमच्या मुलाखतीच्या गुणांवर अवलंबून असते. सर्वात कमी अवधीत सर्वात जास्त गुण मिळवून देणारा हा मुलाखतीचा टप्पा त्यामुळे अतिशय महत्वपूर्ण ठरतो.
मुलाखतीचे तंत्र :
खरे पाहता मुलाखतीचे तंत्र हा technical विषय नसून ती एक अंगभूत कला आहे. ही अशी कला आहे की जी सहज सोप्या पद्धतीने अवगत करता येते. मुलाखतीला इंग्रजी भाषेतील पर्यायी शब्द आहे तो म्हणजे INTERVIEW. INTERVIEW = Introspection + Visualization. Interview घेणारे panel तुमच्या अंतरंगात डोकावू इच्छिते, तुमच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज बांधू इच्छिते. Interview म्हणजे सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नोत्तरे अशी कल्पना करणे साफ चुकीचे ठरेल. तुमचे सामान्य ज्ञान उत्तम आहे म्हणूनच तुम्ही तिथवर पोहोचू शकलात ह्याची Interview Panel ला पूर्ण कल्पना असतेच. पण प्रश्नोतरांच्या आधारे तुमची मते जाणून घेऊन,तुमचे प्रसंगावधान,तुमची निर्णयक्षमता इत्यादी, तुमच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलुना स्पर्श करून एक संवेदनशील,सक्षम अधिकारी म्हणून तुम्ही कार्यक्षम राहू शकता का, याविषयी ठोकताळे बांधण्यासाठी ही चाचणी परीक्षा आहे.
मुलाखतीची तयारी :
मुलाखतीची तयारी करायची म्हणजे नेमके काय करायचे? हा भल्या भल्या लोकांना सतावणारा प्रश्न आहे. बरेचजण बाजारात असलेली Current Affairs ची पुस्तके घेऊन येतात व त्याचा रट्टा मारायला सुरुवात करतात. काहीजण आपल्या MPSC Profile ची प्रिंट काढून त्याआधारे कोणते factual प्रश्न विचारले जातील त्याच्या तयारीला लागतात. पण अशा तयारीला काही अंत नसतो. अशा प्रकारच्या तयारीने Confidence नाही तर Tension वाढते. कारण More Factual Information = Maximum Confusion. कदाचित Objective प्रश्नांची तयारी करताना ४ पर्यायांपैकी १ पर्याय निवडताना या पद्धतीचा उपयोग होवू शकतो पण जिथे Interview Panel समोर बसलेले बरेचजण आपली स्वतःची ओळख सुद्धा चाचरत करून देतात, जिथे स्वतःची १०वी व १२ वी ची मार्क सांगताना तारांबळ उडते तिथे अर्थशास्त्रा ची आकडेवारी तुम्हाला आठवेलच असे नाही;तिथे तुमच्या factual data यामधले confusion तुमचा confidence ऐनवेळेस down करू शकते. हे सरसकट सगळ्यांना लागू पडेलच असे नाही, पण अशा प्रकारची तयारी करणे खरच अपेक्षित नाही.
"It is not enough to give your BEST, but it is required to do what is required."
मग हा प्रश्न उरतोच की मुलाखतीची तयारी करताना काय अपेक्षित आहे ? तर त्यासाठी अपेक्षित आहे Introspection म्हणजेच आत्मपरीक्षण; आपल्या व्यक्तीमत्वामधील गुण दोषांचे आत्मपरीक्षण. आणि Visualisation म्हणजेच आपण Interview Panel समोर बसलेलो आहोत असे डोळ्यांसमोर चित्र आणून ते आपण दिलेल्या माहितीवर कोणते प्रश्न विचारतील याचा विचार करून त्याची उत्तरे देण्याचा सराव करणे.
Interview Panel
मुलाखती घेण्यासाठी तयारी करून आलेले नसते तर मुलाखत देणारा तयारी करून जात असतो. त्यामुळे panel अधांतरी प्रश्न विचारात नाही मुलाखत देणारा जी माहिती देतो त्यावर ते प्रश्न विचारात जातात. कारण असे नसते तर सगळ्यांना एकसारखेच प्रश्न विचारले गेले असते. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे जे आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य असतात त्यांच्या बद्दल थोडी माहिती आधीच घेऊन ठेवणे. शक्यतो माननीय सदस्यांच्या कार्यक्षेत्रा विषयी माहिती घ्यावी. कारण ते आपल्या आवडत्या कार्यक्षेत्रा बाबत हमखास १-२ प्रश्न विचारतातच. उदा. मा. हमीद पटेल सर हे law secretary म्हणून कार्यरत होते त्यामुळे कायदा, घटना विषयक प्रश्न ते विशेष रुचीने विचारतात.
मुलाखतीच्या प्रश्नांचे प्रकार :
१) मुलाखती मध्ये ढोबळमानाने ३-४ पद्धतीचे प्रश्न विचारतात.
Interview Panel ला सामोरे गेल्यानंतर थोडी औपचारिकता झाली की तुम्हाला Relax करण्यासाठी काही प्रश्न विचारले जातात उदा. तुमचे नाव न सांगता तुमची ओळख करून द्या. तसे पाहता टी -२० मध्ये नो बॉल टाकल्यावर फ्री हिट मिळते तशातला हा प्रकार. म्हणजेच तुम्ही या सुरवातीच्या प्रश्नावरच तुमच्याकडे येणाऱ्या प्रश्नांचा रोख तसेच मिळवता येणाऱ्या मार्कांचा रेट ठरवू शकता. त्या अनुषंगाने हा मुलाखातीमधील सर्वात महत्वाचा प्रश्न ठरतो. त्यामुळे ह्या प्रश्नाची काळजीपूर्वक तयारी करण्यास हवी. ह्या प्रश्नाचे उत्तर देताना तुम्ही जी माहिती देणार त्यावर पुढील १०-१५ प्रश्न आधारित असणार हे नक्की. अर्थात हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही तशी माहिती पुरवाल. ह्या तंत्राला "To Guide the interviewer " असे आपण नाव देवूयात.ह्याचे उत्तर देताना साधारणतः अशी माहिती सांगावी कि ज्यावर आणखी प्रश्न विचारेल आणि त्यावर तुम्ही आत्मविश्वास पूर्ण समर्पक असे उत्तर देवू शकाल.
यामध्ये तुम्ही कुठून आलात, तुमचे १०वी पासून पुढे शिक्षण झाले ते ठिकाण/संस्था/विद्यापीठ , विशेष गुणानुक्रमांक मिळवला असल्यास नमूद करावा, विशेष योगदान जसे की Research / Publications/खेळाविषयी/,तुमचा छंद ,कामाचा अनुभव असल्यास,घरातील कुणी व्यक्ती प्रेरणास्थान असल्यास,विशेष preference जसा की DYSP असल्यास जरूर नमूद करावा.
उदा . मी ऐतिहासिक, भौगोलीक दृष्ट्या संपन्न आणि राजकीय वारसा असलेल्या सातारा जिल्ह्यातून आलो आहे,
किंवा संतांची भूमी असलेल्या मंगळवेढा येथून आलो आहे.
माझे शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या ….शाळा/कॉलेज मधून खटाव सारख्या ठिकाणी झाले.
माझे वडील शेतकरी असून ते माझे प्रेरणा स्थान आहेत.
अशा प्रकारचे शब्दप्रयोग highlighter चे काम करतात. त्यावर प्रश्न विचारले जाणार हे निश्चित. आपण आधीच ह्या प्रश्नांची तयारी केल्याने उत्तर सांगताना दडपण येत नाही व तुम्ही दिलेल्या आत्मविश्वासपूर्वक उत्तरांनी Interview Panel तुमच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला लागते.
२) प्रश्नांचा दुसरा प्रकार म्हणजे तुमचे मत जाणून घेणे.
अशा प्रश्नांसाठी तुम्ही मोघम तयार केलेले उत्तर चालणार नाही तर त्याकरिता खरच विचार करून तुम्हाला मत मांडावे लागेल. तुम्ही तुमचे मत व्यक्त करताना विचारले नसल्यास अथवा गरज नसताना कोणत्याही जाती धर्माचा नामोच्चार करणे टाळावे.
उदा. आरक्षणाविषयी तुमचे काय मत आहे?
विशिष्ट धर्माचे लोक दहशतवादी कृत्यांकडे का आकृष्ट होतात?
दलित कोणास म्हणावे?
अशा प्रश्नांबाबत राज्यघटना , कायदा , न्यायालयांचे निर्णय यांचे दाखले देत समर्पक मत मांडावे. तुमचा विशिष्ट जाती धर्माबद्दलचा आकस दिसत कामा नये अथवा ते / आपण, त्यांच्या / आमच्या असे शब्दप्रयोग टाळावे. कारण पुढे तुम्ही अधिकारी म्हणून कार्यरत असताना निर्णय घेत्यावेळी तुमचा वैयक्तिक धर्म/जात त्यामध्ये आड येता कामा नये.
३) प्रश्नांचा तिसरा प्रकार म्हणजे संकल्पनेवर आधारित प्रश्न.
उदा. सहिष्णुता म्हणजे काय?
Secularism म्हणजे काय?
असे प्रश्न विचारले की आपण त्याचे उत्तर देताना त्या शब्दाचा पर्यायी भाषेतील समानार्थी शब्द सांगतो. हे अपेक्षित नाहीये. तुम्ही जशीच्या तशी पुस्तकामधील व्याख्या सांगावी हे सुद्धा अपेक्षित नाही. तुम्हाला नेमके काय समजले ते थोडक्यात सांगता यायला हवे. त्यासाठी तुम्ही उदा. चा वापर करता येइल.
उदा. धार्मिक सहिष्णुता म्हणजे काय?
अनेक धर्मांचे एकत्रितपणाने गुण्यागोविंदाने रहाणे जसे की सम्राट अशोकाचे आजोबा चंद्रगुप्त मौर्य जैन धर्माचे प्रसारक होते तर वडील बिंदुसार अजिविक पंथाचे प्रसारक आणि स्वतः सम्राट अशोक बौद्ध धर्म प्रसारक होते. या उदा. मधून सहिष्णुतेची संकल्पना अधिक स्पष्ट होते.
४) प्रश्नांचा चौथा प्रकार म्हणजे factual प्रश्न विचारणे.
थोडासा घातक आणि त्यामुळे भीतीदायक असा प्रश्नांचा प्रकार. असे प्रश्न शक्यतो अशा वेळेस विचारले जातात ज्यावेळेस panel ला तुम्ही दिलेल्या माहितीवरून काहीसुद्धा प्रश्न विचारू वाटत नाही. विषयांतर करणेसाठी असे प्रश्न विचारले जातात. ह्या प्रश्नांच्या तयारीसाठी confidence पेक्षाही acceptance जास्त महत्वाचा असतो. सर्वच factual प्रश्न तुम्हाला येतीलच असे नाही किंबहुना तसे अपेक्षित देखील नाही. काही प्रश्न आपल्याला येणार नाहीत हा acceptance सुद्धा खूप महत्वाचा असतो. तुमच्या graduation विषयी विचारलेला एखादा साधा प्रश्न तुम्हाला ऐनवेळेस आठवत नाही, अशा प्रश्नांवर अडून न राहता "माफ करा सर मला आता आठवत नाहीये.. "असे बोलून पुढील प्रश्नाकडे वाळू शकता. Interview Panel चे तुमच्या बद्दलचे मत लगेच कलुषित होत नाही.
५) प्रश्नांचा पाचवा प्रकार म्हणजे तुमचे प्रसंगावधान पाहणारे प्रश्न.
उदा. भारताचे विद्यमान राष्ट्रपती कोण आहेत?
आपण पटकन उत्तर देतो 'प्रणव मुखर्जी ' उत्तर बरोबर आहे पण उत्तर देताना माननीय प्रणव मुखर्जी असे बोलण्याचे अवधान राहत नाही.
उदा. भारताचे राष्ट्रीय गीत कुणी लिहिले?
आपण पटकन रवींद्रनाथ टागोर असे बोलून जातो पण उत्तर बंकिमचंद्र चटर्जी असे आहे. प्रश्न नीट ऐकणे सुद्धा फार महत्वाचे आहे.
६) प्रश्नांचा सहावा प्रकार म्हणजे तुमच्या निर्णय क्षमतेवर आधारित प्रश्न.
अशा प्रश्नांमध्ये तुम्हाला प्रसंग सांगितला जातो व तुम्ही सरकारी अधिकारी आहात असे सांगून तुम्हाला प्रसंगानुरूप निर्णय घ्यायचा असतो. तुमच्या उत्तरातून सचोटी, प्रामाणिकपणा, कर्तव्यदक्षता , संवेदनशीलता, निर्णय क्षमता, नेतृत्व गुण, Team Spirit, पारदर्शकता , इत्यादी गुण तपासले जातात. त्यामुळे उत्तर फारच आदर्शवादी देखील असून चालणार नाही ते व्यावहारिक दृष्ट्या देखील पटण्यायोग्य असावे.
७) काही लोक technical क्षेत्रातून स्पर्धा परीक्षांकडे वळलेले असतात उदा. Medical , Engineering , Biotechnology इ. अशावेळेस Interview Panel हमखास हा प्रश्न विचारते की तुमचे क्षेत्र सोडून प्रशासनात का यायचे आहे? अशा वेळेस आपल्या क्षेत्रास कमी लेखून चालणार नाही. प्रशासनात येताना तुमच्या technical background चा कसा चांगल्या प्रकारे उपयोग करता येवू शकतो हे स्पष्ट करावे. उदा. software engg अथवा IT क्षेत्रात कामाचा अनुभव असलेले e-governance साठी अधिक चांगल्याप्रकारे योगदान देवू शकतात व शासन गतिमान करण्यास मदत करू शकतात.
मुलाखतीसंदर्भात इतर काही महत्वाच्या बाबी:
१) मुलाखतीसाठी अत्यावश्यक कागदपत्रांची पूर्तता Interview letter नुसार मुलाखती आधी किमान पंधरा दिवस तरी करावी. मुख्य परीक्षे नंतर लागलीच त्याच्या मागे लागावे.
२)अत्यावश्यक कागदपत्रांची चांगली फाईल बरोबर ठेवावी. मुलाखतीदरम्यान अशी फाईल हातात असल्यास बोलताना अनावश्यक हातवारे कमी होतात.
३)खास मुलाखतीसाठी घेतलेला/शिवलेला ड्रेस एकदा तरी आधी घालून त्याचा अंदाज घ्यावा ऐन मुलाखतीच्या दिवशी प्रयोग नको.लांबून येणाऱ्या उमेदवारांनी एखादा ड्रेस extra ठेवावा. भडक रंग, डोळ्याला त्रास होईल अशी संगती असलेले कपडे शक्यतो टाळावेत. कपड्यांमुळे impression पडत नाही तर त्या मधून maturity दिसावी एवढाच उद्देश असावा.
४)मुलाखतीच्या दरम्यान सुरवातीला Interview Panel मध्ये महिला सदस्य असतील तर त्यांना सर्वप्रथम wish करावे. Thank you , Sorry असे शब्द वापरण्याची सवय नसल्यास त्याचा सराव करावा.
५) डोकेदुखी होईल असे perfume/spray टाळावेत, एखाद्या सदस्यास अशा गोष्टींची allergy असल्यास बेरंग व्हायला नको.
६)मुलाखतीच्या रूम मध्ये प्रवेश करतांना दरवाजावर हलकेच टक टक करावे, आणि मग आत येवू का विचारावे.
७)मुलाखतीच्या दिवशी मुलाखत झालेल्या उमेदवारांशी अनावश्यक चर्चा टाळावी. एखादा न येणारा प्रश्न मनात घोळत राहतो आणि confidence down झाल्यासारखे वाटते.
८)मुलाखतीच्या दिवशी ज्या शहरात मुलाखत होणार आहे त्या शहरातील त्यादिवशीचे एखादे प्रसिद्ध वर्तमानपत्र नक्की वाचून जावे.
९)मुलाखतीदरम्यान तुमची भाषा आणि देहबोली यांमध्ये एकवाक्यता असावी. म्हणजेच तुम्ही जे मांडताय ते तुमच्या देह्बोलीतुनसुद्धा व्यक्त व्हायला हवे. बोलताना चेहऱ्यावर स्मितहास्य असावे. ज्यांनी प्रश्न विचारला आहे फक्त त्यांच्याकडे न पाहता सर्वांकडे बघत उत्तर द्यावे. मुलाखत संपन्न झालेनंतर अदबीने थोडे झुकून धन्यवाद म्हणण्यास विसरू नये.
१०)मुलाखतीसाठी कोणत्या भाषेचा वापर करावा: हे सर्वस्वी प्रश्न ज्या भाषेत विचारला त्यावर अवलंबून असेल. काही मुद्दे मराठी मध्ये मांडता येत नसल्यास उदा. technical मुद्दे, तर पर्यायी भाषेचा वापर interview panel च्या परवानगीने करावा.
११)MOCK Interview : २-३ mock interview तयारीसाठी खूप झाले. पहिला mock साधारणतः interview च्या आधी १५ दिवस आणि शेवटचा mock ३-४ दिवस आधी दिल्यास फायदा होईल. Mock interview चा फायदा confidence वाढण्यासाठी नक्की होईल.
१२)मुलाखतीच्या ४-५ दिवस आधी एखाद्या क्लास वर अथवा जिथे ५०-१०० पर्यंत mob असेल तिथे एखादा विषय घेऊन त्यावर व्याख्यान द्यावे.याने मनोबल वाढण्यास खूप मदत होईल आणि interactive session ला सामोरे गेल्यास आत्मविश्वास देखील उंचावेल.
समारोप :
मुलाखत हा एक mind game आहे. मुलाखतीला सामोरे जाताना हवाय सकारत्मक दृष्टीकोन आणि आत्मविश्वास. स्वताः वरील विश्वास तुम्हाला यशाच्या उंचीवर नक्की नेईल. विश्वास ठेवा आणि पुढे पावूल टाका.
"स्वयंप्रकाशी तू तारा ..
चैतन्याचा गाभारा ..
भर पंखातून स्वप्न उद्याचे..
झेप घे रे पाखरा .. "
©अभिजीत उद्धवराव निकम:
He also guides Students at Insight Academy, Behind ST stand Satara.