Current Affairs

भरोसा कक्ष

कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये महिलांना न्याय देण्याच्या उद्देशाने ‘भरोसा कक्षा’चे नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन झाले आहे. याच धर्तीवर राज्यभरात ‘भरोसा सेल’ची निर्मिती करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

काय आहे भरोसा कक्ष?

हैद्राबादच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये भरोसा कक्ष सुरु करण्याचा पहिल्यांदा प्रयोग नागपूरमध्ये करण्यात आला. हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणामध्ये या कक्षामध्ये दोन्ही बाजूने समुपदेशन केले जाते. यानंतरही काहीच झाले नसल्यास रीतसर पोलीस कार्यवाही केली जाते. या सेलमार्फत पीडित महिलेला विधिविषयक, मानसोपचार, वैद्यकीय मदत एकाच ठिकाणी मिळते. २४ तास हा कक्ष सुरु असणार आहे.


अखिलेश यादव समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष

अखिलेश यादव यांची समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. समाजवादी पक्षाच्या १ जानेवारी २०१६ रोजी झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांना पदावरून हटविण्यात आले आहे. तर, समाजवादी पक्षातील कलहाला जबाबदार धरण्यात येणाऱ्या अमरसिंह यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच मुलायमसिंह यांना पक्षाचे मार्गदर्शक बनविण्यात आले आहे.

मोठ्या गृहनिर्माण संस्थेमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांना सेंद्रिय खात प्रकल्प राबविणे बंधनकारक करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. २० हजार चौरस मीटर पेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या सोसायट्यांचे हा नियम लागू असेल. गृह निर्माण संस्थेबरोबरच मोठी हॉटेल्स व मॉलनाही सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्प राबविणे अनिवार्य आहे.


ज्येष्ठ अभिनेत्री डॉ. ज्योत्स्ना कार्येकर यांचे ३१ डिसेंबर २०१६ रोजी मुंबईत वयाच्या ८२ व्य वर्षी निधन झाले.

अल्पपरिचय


   • डॉ. ज्योत्स्ना कार्येकर यांनी रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमधून अभिनयाचा ठसा उमटविला.
   • ‘आधे-अधुरे’, ‘काचेचा चंद्र’, ‘माणूस नावाचे बेट’, ‘गिधाडे’, गौराई’ ही त्यांची काही गाजलेली नाटके.
   • ‘कथा’, ‘सत्या’, ‘राख’, ‘जोश’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिकाही गाजल्या. ‘साथ निभाना साथिया’, ‘शांती’ आदी मालिकांमधूनही त्यांनी काम केले होते.
   • ‘एचएमव्ही’ कंपनीचे वसंतराव कामेरकर यांच्या त्या कन्या होत्या.
   • स्टार प्लसवरील ‘कहानी घर घर की’ या मालिकेत त्यांनी साकारलेली नानी सर्वाच्या कायम लक्षात राहील.
   • ‘राजा की आयेगी बारात’ यांसारख्या मालिकांमध्येही त्यांनी प्रभावी भूमिका बजावली.

;