Current Affairs

4 January 2017

पाच राज्यातील निवडणुक कार्यक्रम जाहीर

भारतीय निवडणूक आयोगाने उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणीपुर आणि गोवा या पाच राज्यातील विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या पाच राज्यांमधील निवडणुकांची ११ मार्च २०१७ रोजी मतमोजणी होणार आहे.

काही महत्वपूर्ण मुद्दे

        • उत्तराखंड, गोवा आणि पंजाब मध्ये एकाच टप्प्यामद्धे निवडणूक होणार आहे.
        • गोव्यामधील ४० जागांसाठी आणि पंजाबमधील ११७ जागांसाठी ४ फेब्रुवारी २०१७ रोजी तर उत्तरखंडमधील ७० जागांसाठी १५ फेब्रुवारी २०१७ रोजी निवडणुका होणार आहेत.
        • उत्तरप्रदेश मध्ये एकूण ४०३ जागांसाठी सात टप्प्यांमध्ये निवडणुका पार पडणार आहेत. (११, १५, १९, २३, २७ फेब्रुवारी आणि ४ व ८ मार्च २०१७)
        • मणीपुरमध्ये ६० जगणासाठी ४ व ८ मार्च २०१७ रोजी दोन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे.
        • या पाच राज्यांमध्ये एकूण १६ कोटी पेक्षा जास्त पात्र मतदार भाग घेणार आहेत.
        • पंजाब, उत्तराखंड, उत्तरप्रदेश या राज्यांतील उमेदवाराना २८ लाख तर गोवा, मणीपुर राज्यातील उमेदवारांना २० लाख रुपये खर्च मर्यादा घालून देण्यात आली आहे. उमेदवारांना 20 हजारांवरील खर्चासाठी चेकचा वापर बंधनकारक असणार आहे.

उमेदवार जागा- एकूण ६१९ जागा

        • उत्तर प्रदेश- 403 जागा
        • पंजाब- 117 जागा
        • उत्तराखंड – 70 जागा
        • मणिपूर- 60 जागा
        • गोवा- 40 जागा

स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१७ पाचशे शहरांमध्ये सुरू

        • केंद्रीय नागरी विकास मंत्रालयाने १ लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ५०० शहरांमध्ये स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१७ सुरू केले आहे.
        • स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ‘क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया’ मार्फत हे सर्वेक्षण होणार आहे.
        • शहारच्या पालिकेकडून मिळणारी माहिती, प्रत्यक्ष निरीक्षण आणि स्वातंत्र्य मूल्यांकन करून आणि शहरातील नागरिकांचा अभिप्राय या आधारे हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
        • पालिकेकडून मिळणार्‍या महितीला ९०० गुण, प्रत्यक्ष निरीक्षण आणि स्वातंत्र्य मूल्यांकणाचे आधारे मिळणार्‍या महितीला ५०० गुणा आणि जनतेच्या अभिप्रायला ६०० गुण देण्यात येणार आहे.
        • नागरिक आपला अभिप्राय स्वच्छ भारत सर्वेक्षणाच्या वेबसाईड वाराही आपला अभिप्राय देऊ शकणार आहेत किंवा १९६९ या नंबर वर मिस्सड कॉल देहूनही अभिप्राय देता येणार आहे.

स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१६ मध्ये ७३ शहरांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये म्हैसूरने प्रथम क्रमांक पटकावला होता तर चांदीगड दुसर्‍या स्थानी होते.

एम.के. स्टॅलिन यांची DMK च्या कार्याध्यक्षपदी निवड

        • तमिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांची द्रविड मुण्णेत्र कळघम (DMK) पक्षाच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली असून पक्षाचे खजिनदार पद आणि तमिळनाडू विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारीही स्टॅलिन यांच्याकडे आहे.
        • स्टॅलिन यांचे वडील व तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच
;